Cart
Image
Red Hot Tomato
1 x $65.00
Image
Vegetables Juices
1 x $85.00
Image
Orange Sliced Mix
1 x $92.00
Image
Orange Fresh Juice
1 x $68.00
// Welcome to our company

Blog Details

Image

सेंद्रिय शेती - काळाची गरज

     आपला भारत कृ़षीप्रधान देश आहे. आपल्या देशात 70% पेक्षा जास्त लोक शेती व शेतीपुरक व्यवसायावर अवलंबून आहेत. स्वातंन्न्य मिळाल्यानंतर धान्यांच्या उत्पादन वाढीसाठी निरनिराऴया तंत्रांच्या वापरावर विचार होऊ लागला.

    भरघोस उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांच्या वापरास सुरूवात झाली. रासायनिक खतांबरोबरच अधिक उत्पादन देणारे संकरीत वाणसुध्दा घराघरामध्ये पोहोचले.

    सुरूवातीच्या काळात रायायनिक खतांमुळे संकरीत वाणांमुळे उत्पादनवाढ झपाट़याने झाली. वाढत्या लोकसंख्येची गरज पुर्ण करण्यासाठी त्याची काही अंशी गरजही होती पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच, त्यानुसार आज आपण जे चित्र अनुभवतोय ते पुर्ण वेगळे आहे. रासायनिक खतांचा,किटकनाशक,बुरशीनाशक, तणनाशकांचा अवाजवी वापर सुरू झाला. गरजा वाढल्यामुळे जमिनीला विश्रांती देणे बंद झाले पाण्याचा भरमसाठ वापर होऊ लागला. शेतीमध्ये यांत्रिकीकरण झाले. अवजड वाहनांनी मशागत होऊ लागली. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे प्रथम जमिनीचे जीला आपण काळी आई म्हणतो तीचे आरोग्य धोक्यात आले. जमिनीमध्ये झारांचे प्रमाण वाढून जमिनी चोपण, क्षारपड होऊ लागल्या.

     तिव्र रासायनिक किटकनाशके, तणनाशके, औषधे इत्यादीच्या अतिवापरामुळे जमिनीमधील उपयुक्त जिवाणुच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ लागला. नैसर्गिक जलस्त्रोत धोक्यात आले परिणामी मानवी आरोग्यावर या सर्व बाबींचा थेट परिणाम झाला. तिव्र रासायनिक किडनाशके,बुरशीनाशके, इ. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मानवी आहारात आढळू लागले. परिणामी आज आपण कॅन्सर, मधुमेह, ह़दयरोग. इ. आजारांना जवळून अनूभवतोय हे सर्व टाळणे आपल्या सर्वाच्या हातात आहे.

    आज आपण जमिनीच्या आरोग्याची काळजी घेतली तरच पुढच्या पिढीला सदृड आणि निरोगी जमिन सोपवता येईल. तसेच मानवी आरोग्यही धोक्यात येणार नाही. याकरीता काही ठळक बाबींवर विचार आणि कृती करण्यास आजपासुन सुरूवात करूया.

  जमिनीमध्ये मुबलक प्रमाणात शेणखत,सेंद्रिय खतांचा सातत्यपूर्ण वापर करावा.

  पालापाचोळा, काडीकचरा न पेटविता जिवाणूंचा वापर करून कुजऊन जमिनीमध्ये गाढावा.

  हिरवळीच्या खतांचा वापर करावा. (ताग व धैंच्या इ.)

  पाण्याचा गरजेनुसार मर्यादीत वापर करावा.

  जमिनीची घात (वापसा) साधावी.

  स्लरींचा वापर म्हणजेच गुळ,गोमुत्र,शेण, बेसनपीठ,जिवाणू इत्यादीचा सातत्यपूर्ण वापर करावा.

  जमिनीला विश्रांती द़यावी.

  पिकावर पिके घेणे टाळावे.

  पिक फेरपालट करणे सुध्दा गरजेचे आहे.

  अवजड वाहनांची मशागत टाळावी.

  तीव्र रासायनिक औषधांचा वापर बंद करावा.

  किड रोग नियंत्रणासाठी जैविक सेंद्रिय निविष्ठांचा वापर करावा.

 

#

Curated Products

Provide Curated Products for all product over $100

#

Handmade

We ensure the product quality that is our main goal

#

Natural Food

Return product within 3 days for any product you buy

#

Free home delivery

We ensure the product quality that you can trust easily