शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचा व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो.
गोठा नियोजन कसे असावे.
भरपूर उजेड येईल, हवा खेळती राहील अशा ठिकाणी गोठे असावेत. गोठे उंचावर असावेत.
गव्हाणी टिकाऊ व पक्क्या असाव्यात.
छप्पर मध्यभागी 15 फूट व बाजूस 6 ते 8 फूट असावे. जमीन पक्की असावी.
जनावरांच्या मागच्या बाजूस गोठा उतरता असावा, शेवटी मूत्रवाहक नाली असावी.
प्रत्येक जनावरासाठी साधारणतः 65 ते 75 चै. फूट जागा असावी.
गोठा धुतल्यानंतर पाणी शेतीमध्ये जाईल अशी व्यवस्था करावी.
दूध काढताना घ्यावयाची काळजी.
दूध काढण्याअगोदर गोठा स्वच्छ करावा. त्यांनतर कास व शेपटीमागील भाग स्वच्छ पाण्याने धुवावा.
कास स्वच्छ फडक्याने कोरडी करावी.
दूध काढणा-या माणसाचे हात स्वच्छ असावेत. त्याला कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार नसावा. त्याने नखे काढलेली असावीत.
दूध कोरड्या हाताने काढावे.
दूध हलक्या हाताने आणि वेगाने काढावे. दूध काढण्याच्या वेळेत बदल करू नये.
दूध काढण्याची भांडी स्वच्छ व कोरडी असावीत.
प्रत्येक आठवड्याला कासदाह चाचणाी करावी.
भाकड काळाचे नियोजन :
रेतन केलेल्या तारखेची नोंद महत्वाची असते कारण त्या नोंदीनुसार तिचे दूध काढणे बंद करावे. प्रसूतीच्या अडीच ते तीन महिने अगोदर दूध काढणे बंद करावे. दूध काढणे बंद केल्यामुळे दूग्ध उत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गायीची झालेली शारीरिक झीज भरून काढण्यासाठी व गर्भातील वासराच्या वाढीसाठी उपयोगात आणले जाते. पुढील वेतातील दुधासाठी कासेची वाढसुध्दा चांगल्या प्रकारे होईल व विण्यापुर्वी गायीचे व गर्भातील वासराचे आरोग्य चांगले राहील. विण्यापूर्वी प्रत्येक गाय अडीच ते तीन महीने भाकड असावी,देशी गायीच्या दोन वेतात दीड ते दोन वर्षे अंतर राहते. त्या जेमतेम 6 ते 7 महिनेच दूध देतात. म्हणजेच विण्यापूर्वी 12 ते 17 महिने ही भाकड राहतात. मात्र संकरित गायी आणि त्यामध्ये पहिल्या वेतातील गायी वेत संपत आले तरी बरेच दूध देतात. अशा गायी आटवणे खूप आवश्यक असते.
विण्यापूर्वी किमान अडीच महिने गाय भाकड राहिली पाहिजे नाहीतर त्यांचे पुढील वेतातील दूध उत्पादन निश्चितच कमी होते. गाय जर जास्त दुधाळ असेल तर याहून अधिक काळ म्हणजे तीन महिन्यांपर्यंत भाकड ठेवणे गरजेचे असते. गाय 3 ते 4 लिटर दूध देत असेल, तर धार काढणे एकदम बंद करावे. धार दिवसातून दोनदा काढत असल्यास ती एकदा आणि एकदा काढत असल्यास ती दोन दृ तीन दिवसाआड काढावी.
दूध कमी झाल्यावर एकदम धार थांबवावी. यामुळेही दूध कमी न झाल्यास गायीची हीरवी वैरण बंद करावी. आणि त्यानेही न झाल्यास एक दिवस पाणी कमी पाजावे हे उपाय योजण्यापूर्वी गायीला दूभत्या जनावरांपासून बाजूला काढून भाकड जनावरांमध्ये बांधावे. अशा रीतीने गाय आटल्यानंतर ती 2.3 दिवसांत कास कमी करते, त्यानंतर तिच्या प्रत्येक सडात पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिजैविक सोडावे. यामुळे भाकड काळात गायीला काससुजीचा धोका होणार नाही. गाय पूर्णतः भाकड ;आटल्यानंतरद्ध झाल्यानंतर गरजेनुसार आहार परत सुरू करावा.
दुभत्या गाईचे संगोपन :
गाईला दुधोत्पादनाच्या प्रमाणात खाद्य द्यावे. गाईला सरासरी 15 ते 20 किलो हिरवा, 5 ते 8 किलो कोरडा चारा रोज द्यावा. दूध उत्पादनासाठी शरीर पोषणासाठी दीड ते दोन किलो खुराक द्यावा.
गाईंना रोज 2 ते 3 तास फिरायला मोकळे सोडावे, त्यामूळे त्यांच्या शरीराचा व्यायाम होईल. जनावरांना समतोल खाद्य मिळेल याची काळजी घ्यावी.
हेही वाचा : गाई - म्हशीच्या गर्भधारणेसाठी आॅक्टोबर ते मार्चचा काळ उत्तम असतो.
माजावर आलेल्या गाईचे व्यवस्थापन
गाय सुमारे 21 दिवसांच्या अंतराने माजावर येते. माजाची लक्षणे दिसल्यापासून सुमारे 10 ते 18 तास भरल्यानंतर पुढची 20 ते 21 दिवस माज दाखवत नाही.
काही गाई दुस-या.तिस-या महिन्यांत माजावर येतात. अशा गाईंची पशुवैद्यकीयांकडून तपासणी करून औषधोपचार करावा.
गाभण गाईचे संगोपन :
गाभण गाईंना शेवटच्या अडीच महिन्यांच्या काळात दीड किलो समतोल खाद्याचा जादा पुरवठा करावा. विण्याच्या अगोदर मोकळे फिरायला द्यावे. गाई विण्याच्या वेळी दूरूनच तिच्यावर लक्ष ठेवावे.
गोठ्यात टोकदार दगड व खिळे असू नयेत.
जनावरांचे प्रसूतिपूर्व व्यवस्थापन महत्वाचे :
जनावरांची उत्पादनक्षमता ही त्यांच्या आनूवंशिक गुणांवर त्याचप्रमाणे त्यांच्या वयात येण्यापूर्वीच्या शारीरिक वाढीवर अवलंबून असते. वयात येण्यापूर्वीची शारीरिक वाढ प्रामुख्याने गर्भात असतानाच्या वाढीवर अवलंबून असते म्हणून गाभण काळात जनावरांची योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते.
गाभण जनावरांची प्रसुतिपूर्व काळजी घेतल्यास पुढे येणा-या अडचणीवर मात करता येते. दुभत्या जनावरांबरोबर असणा-या म्हशींचीही काळजी घेणे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. म्हशींचा गाभण काळ 10 महिने 10 दिवस कालावधीचा तर गायींचा गाभणकाळ 9 महिने 9 दिवसांचा असतो. गाभण जनावरांचा खुराक समतोल असावा त्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, खनिजद्रव्य हे सर्व घटक समतोल प्रमाणात असावेत.
वासरांचे संगोपन :
वासरू जन्मल्यानंतर गाय त्याच्या नाकातील कानातील व तोंडातील सर्व चिकट पदार्थ स्वच्छ करते. मात्र वासराचे कोवळे खूर लवकर काढावेत. नाळ आपोआप तुटली नसल्यास ती 2 ते 3 सेंटिमीटर अंतरावर जंतुनाशकामध्ये भिजवलेल्या दो-याने घट्ट बांधून त्यापुढील भाग निर्जंतुक केलेल्या कात्रीने कापावा. त्यानंतर त्यावर दिवसातून 2 ते 3 वेळा निर्जंतुक द्रावण लावावे.
वासरू जन्मल्यानंतर सुमारे एक तासाच्या आत त्याच्या वजनाच्या 8 ते 10 टक्के चीक पाजावा. तसेच प्रतिदिवस याच प्रमाणात दूध पाजावे. वासराला दूध पाजाल्यानंतर थोडा वेळ तोंडाला मुसकी बांधावी.
शिंगे वाढू नयेत म्हणून 7 ते 10 दिवसाच्या आत तज्ज्ञांच्या सहकार्याने शिंगे काढावीत.
खाद्य व्यवस्थापन :
ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध आहे, अशा हिरव्या कुरणात गाभण जनावरांना चरण्यासाठी सोडण्याची सोय असल्यास ते निश्चितच जनावरांच्या फायद्याचे ठरते, त्यामुळे गाभण जनावरांना ताजी वैरण खायला मिळते. बरोबरच मोकळî जागेत फिरायला मिळत असल्याने मोकळी हवा, सूर्यप्रकाश आणि आवश्यक तो शारीरिक व्यायाम होतो. हिरव्या चा-याची सोय नसेल तर जनावरांना गोठ्यातच भरपूर प्रमाणात हिरवा चारा खाण्यास देता येईल, अशी व्यवस्था करावी.
शेवटच्या दोन महिन्यांत गर्भाची वाढ झपाट्याने होते, त्यामुळे या काळात चा-यात वाढ करावी. कारण गर्भावस्थेच्या अंतिम काळात गाभण जनावराला स्वतःच्या पोषणाकरिता किमान एक ते दीड किलो पशुखाद्य द्यावे. गर्भाच्या वाढीसाठी आणखी एक ते दीड किलो जास्तीचे पशुखाद्य देण्याची गरज असते. अशा वेळी जास्त खाद्य दिल्याने गर्भाची वाढ चांगल्या प्रकारे होते.
Provide Curated Products for all product over $100
We ensure the product quality that is our main goal
Return product within 3 days for any product you buy
We ensure the product quality that you can trust easily